#

Advertisement

Monday, August 7, 2023, August 07, 2023 WIB
Last Updated 2023-08-07T11:23:38Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राज ठाकरे यांना फोन करण्यासाठी उद्धव ठाकरे तयार

Advertisement

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावं, अशी दोन्ही पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. याशिवाय सर्वसामान्य जनतेमधील अनेकांची तशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्याकडून त्यासाठी प्रयत्न देखील करण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्याकडून हवा तसा सकारात्मक प्रतिसाद मिळू शकला नाही. पण उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करण्यास तयारी असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी खासगीत याबाबतचं वक्तव्य केलं आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना फोन करण्यासाठी तयार असल्याची माहिती मिळत आहे. वेळ आल्यास राज ठाकरे यांच्याशी बोलणार, असं उद्धव ठाकरे खासगीत म्हणाले आहेत..