#

Advertisement

Monday, August 14, 2023, August 14, 2023 WIB
Last Updated 2023-08-14T11:21:39Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राज ठाकरे भाजपच्या स्टेजवर दिसणार का?

Advertisement

मुंबई : भाजपने आपल्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. पण भाजपसोबत आधीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. त्यामुळे भाजपच्या ऑफरवर कोणताही निर्णय घेतला नाही, असा मोठा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. भाजपची ऑफर पूर्णपणे फेटाळल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलेलं नाही. त्यामुळे राज ठाकरे हे आगामी काळात भाजपच्या स्टेजवर दिसणार का? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली होती. यावेळी ठाकरे यांनी हे विधान केलं आहे. मला भाजपची ऑफर आली आहे. युती करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आहे. पण मी कोणत्याही अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेलो नाही. युतीचं नेमकं गणित काय असेल याबाबतही काहीच स्पष्टता नाहीये. त्यामुळे मी अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेलो नाही, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलं.