#

Advertisement

Friday, August 11, 2023, August 11, 2023 WIB
Last Updated 2023-08-11T12:04:25Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मुख्यमंत्री शिंदे यांच्या खात्यात अजित पवारांची ढवळाढवळ ![

Advertisement

नागपूर  : अजित पवार शिंदे सरकारमध्ये सामील झाले असून त्यांनी पुन्हा एकदा शिंदे यांच्या खात्यात ढवळाढवळ सुरू केली आहे. खुद्द राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्याचा गौप्यस्फोट केला आहे. विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला.
खात्याचा संबंध नसताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वॉर रूममध्ये राज्यातील प्रोजेक्टचा आढावा घेतला. त्यामध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष असतात. त्याचा फायनान्स विभागाचा काही संबंध नसतो. म्हणजे वॉररूममध्ये कोल्डवार सुरू झाला आहे. तो कोल्ड वॉर कुठल्या दिशेने गेलाय हे कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहिलं असेल, असा गौप्यस्फोट विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
दरम्यान, सत्ताधारी पक्षातून या कोल्ड वॉरवरून सारवासारव सुरू केली आहे. विजय वडेट्टीवार सध्या राज्याचे नवीन विरोधी पक्षनेते बनलेले आहेत. त्यामुळे आपलं वजन बनवण्याकरता दुसऱ्यांवर त्यांना टीका करावीच लागते. पूर्वी महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना फोन करत नव्हते. परंतु आत्ताच्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूममध्ये उपमुख्यमंत्री बैठका घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवताना पाहायला मिळत आहेत, असं आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.