#

Advertisement

Wednesday, August 23, 2023, August 23, 2023 WIB
Last Updated 2023-08-23T11:10:30Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

तुळजापूरला चाललेल्या भाविकांच्या गाडीला अपघात, चार महिला जागीच ठार

Advertisement

सोलापूर  : नगरहून तुळजापूरला दर्शनासाठी चाललेल्या भाविकांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. ट्रकने गाडीला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. मोहोळ तालुक्यातील यावली गावाजवळ हा अपघात झाला. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. अन्य सहा जण जखमी झाले असून, जखमींमध्ये एका 7 वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी सोलापूर सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नगर जिल्ह्यातील रांझणगाव येथील 10 जण मारुती इको कारने तुळजापूरला दर्शनासाठी चालले होते. सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील यावली गावाजवळ येताच भाविकांच्या गाडीला मालट्रकने मागून जोरदार धडक दिली. यात गाडीला भीषण अपघात होऊन गाडीतील तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात सात जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी सोलापूर सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. अन्य सहा जणांची प्रकृतीही चिंताजनक आहे.
आदम अली शेख, हिराबाई रामदास पवार, कमलाबाई मारुती वेताळ, द्वारकाबाई नागनाथ गायकवाड अशी अपघातातील मयतांची नावे आहेत. तर बाई बाबू पवार, छकुली भीमा पवार, सई योगीराज पवार, मंदाबाई नाथा पवार, सुरेखा भारत पवार आणि बायजाबाई रामदास पवार अशी जखमींची नावे आहेत.