Advertisement
नागपूर : राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी एक दावा करून शरद पवार गटाच्या तंबूत खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार गटाचे आणखी तीन आमदार आमच्याकडे येणार आहेत. लवकरच या तिघांचा प्रवेश होणार आहे, असा दावा धर्मरावबाब यांनी केला आहे.
शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री राजेश टोपे हे अजितदादा गटात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. तशी जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर धर्मरावबाबा आत्राम यांना विचारलं असता त्यांनी थेट मोठी माहितीच दिली. शरद पवार गटाचे आणखी तीन आमदार हे अजितदादा गटात येणार आहेत. सध्या आम्हाला 45 आमदारांचं समर्थन आहे. त्यात तीन आमदार वाढून 48 होणार आहे. तीन आमदार नक्की येणार आहेत, असा दावा धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे.
