Advertisement
पुणे : काँग्रेसचे नेत आमच्या संपर्कात आहेत. आमचे नेते देवेंद्र फडणवीसांनी बोर्ड लावला आहे की, नो रुम, हाऊसफुल्ल आहे, असं भाजपचे वरिष्ठ नेते, मंत्री मुनगंटीवार म्हणाले. शिवसेनेतील शिंदे गट फुटला अन् भाजपसोबत जात सरकार स्थापन केलं. मग राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते आणि तत्कालिन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेही सरकारमध्ये सामील झाले. या पाठोपाठ काँग्रेसचे नेतेही भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा होतेय. यावर भाजपचे वरिष्ठ नेते, मंत्री मुनगंटीवार म्हणाले. काँग्रेसमधील अनेक नेत्यांशी बोलणं झालं आहे. काँग्रेसचे नेते अधूनमधून भेटत असतात. काँग्रेसच्या एका नेत्यानं सांगावं की, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही,
