Advertisement
पुणे | भाजप नेते गिरीश बापट यांचे निधन झाल्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघांची जागा रिक्त झाली आहे. आता या ठिकाणी पोटनिवडणूक होण्याची शक्यता नाही. कारण त्यांच्या निधनानंतर अजूनही पोटनिवडणूक जाहीर झाली नाही. यामुळे भाजपने मिशन 2024 ची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी लोकसभा मतदार संघानुसार जबाबदारी निश्चित केली गेली आहे. या प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाचे नेते महेश लांडगे यांना धक्का दिला आहे.
पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात समन्वयक भाजपकडून नेमले आहे. पुणे लोकसभा मतदार संघाची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दिली होती. त्यानंतर शरद पवार यांचे वर्चस्व असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी राहुल कुल यांच्याकडे दिली. तसेच जून महिन्यात शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्यांकडे दिली होती. परंतु आता शिरुरची जबाबदारी महेश लांडगे यांच्याकडून काढून घेतली आहे. आता ही जबाबदारी राजेश पांडे यांच्याकडे दिली आहे.
