Advertisement
आगामी निवडणुकीची गणितं : ऍड. कोमलताई यांचा वाढता जनसंपर्क
सोलपूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आणि दावेदार कोण? कोणता पक्ष कोणाला उमेदवारी देणार अशी ठोकताळे बांधले जात असतानाच यामध्ये माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि त्यांच्या कन्या ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचे नाव आघाडीवर आहे. ढोबळे पिता-कन्या सुरवातीपासूनच जिल्ह्यात तसेच मंगळवेढा, मोहळ मतदार संघात कार्यरत आहेत. लक्ष्मणराव ढोबळे यांनी भाजपच्या माध्यमातून तर ऍड. कोमलताई यांनी बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून थेट जनतेत मिसळत आहेत. "ग्रासरूठ'वर काम करीत असल्याने जनमाणसात उंचावलेली या पिता-कन्येचे प्रतिमा विरोधकांची चिंता वाढविणार आहे. याच पार्श्वभूमीवर ऍड. कोमलताई यांचा रविवारी (ता.6) सोलापूरचा दौरा विशेष ठरणार आहे.राज्यात राजकीय घडमोडी घडत असताना सोलापूर जिल्ह्यातील राजकाणानेही गेल्या काही दिवसांत वेगळे वळण घेतले आहे. सोलापुरात आघाडीचा पक्ष म्हणून भाजपने आपले स्थान भक्कम केले आहे. त्यामुळे कमळाच्या झेंड्याखाली आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढविण्यास अनेक परिचीत, सुपरिचीत आणि कुपरिचीत नावे विविध राजकीय पक्षांच्या यादीत "इच्छूक' म्हणून वाढू लागली आहेत. परंतु, जिकडे भेड तिकडे खेळ, अशा वृत्तीला भाजप सारख्या पक्षात थारा नसल्याने जनमाणसांत मिसळणाऱ्या उमेदवारालाच पक्ष संधी देणार हे निश्चित मानले जात आहे. यामुळे अनेकांनी तसे प्रयत्नही सुरू केले आहेत. मात्र, यामध्येही ढोबळे आघाडीवर असून त्यांना भक्कम विरोधक सध्या तरी नाही. याशिवाय बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून मतदार संघात कार्यकर्त्यांचे विणलेले जाळे ही मोठे जमेची बाजू त्यांच्याकडे आहे. या परिषदेचे कार्यकर्ते ऐनवेळी निवडणूक फिरवू शकतात याची जाणीव अनेकांना आहे. विशेष म्हणजे बहुूजन रयत परिषदेची संपूर्ण "कमांड' सध्या ढोबळे यांच्या कन्या ऍड. कोमताई यांच्यावर आहे. या माध्यमातून त्या सातत्याने आपल्या मतदारसंघाववर तसेच हक्काच्या वोट बॅंकेवर लक्ष ठेऊन आहेत. रविवारी (ता.6) होणारा दौराही याच पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे.
