#

Advertisement

Tuesday, August 29, 2023, August 29, 2023 WIB
Last Updated 2023-08-29T11:17:18Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

जय पवार यांची राजकारणात एन्ट्री

Advertisement

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे लहान सुपुत्र जय पवार राजकारणात सक्रिय होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तसे संकेतच जय पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिले. अजित पवारांच्या बारामतीतल्या सभेनंतर दोन दिवसातच राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयाला जय पवार यांनी भेट दिली. या भेटीनंतर जय पवार राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा रंगली आहे. 
जय पवार राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयात आले यावेळी त्यांना राजकारणात सक्रीय होण्याची गळ कार्यकर्त्यांनी घेतली. त्यावेळी जय पवार यांनी कार्यकर्त्यांना अजित दादांना भेटा त्यांनी ग्रीन सिग्नल दिला तर आपण तयारच आहोत असं सांगितलं. त्यामुळे पार्थ पवारांनंतर आता जय पवार यांचीही लवकरच राजकारणात एण्ट्री होणार आहे.

पार्थ मोठा तर, जय लहान\\..
जय पवार हे  शरद पवार यांचे नातू आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आहेत. अजित पवार यांना दोन मुलं आहेत. मोठा मुलगा पार्थ आहे. तर, जय हा त्यांचा लहान मुलगा आहे. पार्थ पवार हे राजकारणात सक्रिय आहेत. पार्थ पवार यांनी मावळची लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा दारूण पराभव झाला होता.  जय पवार बारामतीतील समाजकारणात सक्रीय आहेत. आता लवकरच जय पवार बारामतीच्या राजकारणात देखील सक्रिय होणार आहेत.