#

Advertisement

Tuesday, August 29, 2023, August 29, 2023 WIB
Last Updated 2023-08-29T15:14:06Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अजित पवार यांच्या गटाकडे लक्ष देऊ नका !

Advertisement

मुंबई : संभ्रम ठेवू नका, लढायला तयार राहा, माझ्यावर टीका करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे लक्ष देऊ नका, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. मी लढण्यासाठी तयार आहे. तुम्हीदेखील लढायला तयार राहा. ही विचारांची लढाई आहे. विचारांची लढाई विचारांनीच लढाईची आहे. संभ्रम ठेवू नका, असं पवार म्हणाले आहेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या प्रमुख नेत्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना मार्गदर्शन केलं,  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाची दोन दिवसांपूर्वी रविवारी बीडमध्ये जाहीर सभा पार पडली होती. या सभेत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. तेलगी प्रकरणावरुन शरद पवार यांनी आपला राजीनामा घेतला. पण आपणच तेलगी विरोधात कारवाई केली होती, असं भुजबळ म्हणाले. भुजबळ यांच्या या वक्तव्यार शरद पवार यांनी आजच्या बैठकीत उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं. “तेव्हा राजीनामा घेतला नसता तर छगन भुजबळ तुरुंगात गेले असते”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.