Advertisement
| पंढरपुरात अण्णा भाऊ साठे जयंतीदिनी समाजोपयोगी उपक्रम पंढरपूर : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यावर भर द्यावा, अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजातील वंचितांना मदत करावी, असे आवाहन बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले होते. त्यास सोलापूरसह राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील एन.वाय. ग्रपुनेही नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयाचे सरकारी वकील ऍड. सारंग वांगीकर यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या नेत्र शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. राज्यभरात सध्या डोळ्यांच्या आजाराची साथ पसरली आहे, ही बाब लक्षात घेता या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. या शिबिरामध्ये 500 पेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. ज्या रूग्णांच्या डोळ्यांमध्ये आजारसदृश्य लक्षणे दिसून आली त्यांना मोफत औषधे देण्यात आली. या शिबिराच्या आयोजनाबाबत प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी आढावा घेत या उपक्रमाबाबत कार्यकर्त्यांचे कौतूक केले. अशा उपक्रम आयोजनातून समाजातील युवकांत जागृती होत असल्याचबाबत त्यांन समाधानही व्यक्त केले. | |||

