#

Advertisement

Tuesday, August 29, 2023, August 29, 2023 WIB
Last Updated 2023-08-29T10:33:03Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

तलवार बाहेर काढल्याने आमदारांवर गुन्हा

Advertisement

मुंबई : हिंगोलीत उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता आमदार संतोष बांगर यांच्यावर जोरदार टीका केली. या सभेनंतरच दुसऱ्यादिवशी म्हणजे सोमवारी संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढली होती. या कावड यात्रेच्या माध्यमातून संतोष बांगर यांनी शक्ती प्रदर्शन केलं. जनसमुदायासमोर तलवार काढून दाखवली. डीजेला परवानगी नसताना, डीजे लावला. या प्रकरणी कळमनुरी पोलीसात गुन्हे दाखल झाले आहेत.  उद्धव ठाकरे यांची हिंगोलीत रविवारी सभा झाली. गद्दार बेंडकुळ्या दाखवत आहे.  याचा उद्धटपणा चिरडून गाडून टाकावा लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर संतोष बांगर यांनी प्रत्युत्तर दिलं. “बेंडकुळ्या आहेत, तेच दाखवतील. खऱ्या बेंडकुळ्या कुठे असतील, तर मायबाप जनता आहे.