#

Advertisement

Monday, August 21, 2023, August 21, 2023 WIB
Last Updated 2023-08-21T11:36:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

समृद्धी महामार्गावर फोटो-रील्स काढाल तर तुरुंगवास

Advertisement

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गवर फोटो-रील्स काढल्यास 500 रुपयांचा दंड आणि एक महिन्याचा तुरुंगवास होणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहने थांबवून रील्स आणि फोटो काढणं प्रवाशांना आता महागात पडणार आहे. वाहतूक पोलिसांनी समृद्धी महामार्गावर रील्स तसेच फोटो काढणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
समृद्धी महामार्गावर काही तरुण फोटो, रील्स काढण्यासाठी वाहतुकीस अडथळा आणत असल्याचं आढळून येत असल्याने राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे आता राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांनी अशाप्रकारे महामार्गावर फोटो किंवा रील्स तयार करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.
गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर वाहने थांबवून अनेक तरुण तरुणी फोटो आणि रील्स काढत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबादजवळ समृद्धी महामार्गावरील पुलावर चढून हुल्लडबाज तरुण रील्स काढत असल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी मोठं पाऊल उचललं आहे.