#

Advertisement

Monday, August 21, 2023, August 21, 2023 WIB
Last Updated 2023-08-21T11:48:24Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

तलाठी भरती अर्ज शुल्क 1 हजार : परीक्षा केंद्रावरही विद्यार्थ्यांची लूट

Advertisement

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर तलाठी भरती परीक्षा उशीराने सुरु झाल्या. आधीच दूरवरचे परीक्षा केंद्र आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. त्यात आता  परीक्षा केंद्रावर बॅग आणि मोबाईल ठेवण्यासाठी पैसे आकारल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तलाठी भरती परीक्षेत विद्यार्थ्यांचाच गोंधल उडालाय. तलाठी भरती परीक्षा अर्ज भरताना आधीच विद्यार्थ्यांकडून 1 हजार रुपये अर्ज शुल्क घेण्यात आले होते.  राज्यात तलाठी पदाच्या एकूण 4 हजार 466 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी 11 लाख 10 हजार ५३ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. असे असताना विद्यार्थ्यांकडून परीक्षा केंद्रावर पैसे आकारले जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरात परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींकडून बॅगा ठेवण्याचे पैसे घेतल्याचा प्रकार घडला आहे. परीक्षा केंद्राबाहेर बॅगा ठेवण्यासाठी प्रत्येकी 10 रुपये घेत असल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला आहे.