#

Advertisement

Friday, August 18, 2023, August 18, 2023 WIB
Last Updated 2023-08-18T17:22:49Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

खडकी येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

Advertisement

बहुजन रयत परिषद सोलापूर संपर्क प्रमुख समाधान वाघमारे यांचे आयोजन

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्‍यातील खडकी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त बहुजन रयत परिषद सोलापूर संपर्क प्रमुख समाधान वाघमारे यांच्यासह समाजबांधवांनी भव्य मिरवणूकीचे आयोजन केले होते. याचे उद्‌घाटन बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ऍड. कोमलताई यांनी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन करून त्यांच्याशी संवाद साधला. समाजाच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. या कार्यक्रमास बहुजन रयत परिषद खडकी शाखा अध्यक्ष ज्ञानेश्वर मस्के, उपाध्यक्ष तम्मा वाघमारे, ऍड. बापूसाहेब मिटकरी, धनाजी गडदे, हैदर केंगार, मधुकर भंडगे, माजी सरपंच रघुनाथ बेलदार, युवक नेते संजय सिंग राजपूत, गणेश कांबळे, नागेश अवघडे, गोविंद कांबळे, गणेश रणदिवे, भागवत पाटील, कटारे सर, आप्पा शेवडे, प्रकाश खंदारे, विक्रम अवघडे, संभाजी मस्के, कृष्णा कांबळे, सागर कांबळे, अंबादास कांबळे, नानासाहेब मस्के यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.