Advertisement
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीच्या 46 व्या एजीएममध्ये मोठी घडामोड घडली आहे. मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बोर्डावरुन राजीनामा दिला आहे. आता त्यांच्याजागी ईशा अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरआयएल बोर्डाने संचालक मंडळावर ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्या नियुक्तीची शिफारस केली आहे. नीता अंबानी बोर्डामधून बाहेर पडल्या आहेत. पण त्या रिलायन्स फाऊंडेशनच्या चेयरपर्सन पदावर कायम राहतील. मुकेश अंबानी यांनी एजीएममध्ये सांगितलं की, “मागच्या 10 वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजने 150 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. कुठल्याही कॉर्पोरेट ग्रुपकडून करण्यात आलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे” असं त्यांनी सांगितलं.
रिलायन्सच नेट प्रॉफिट किती हजार कोटी?
रिलायन्सचा कंसोलिडेट रेवेन्यू 9,74,864 करोड़ रुपये आहे. वित्त वर्ष 2023 मध्ये रिलायन्सचा EBITDA 1,53,920 करोड़ रुपये होता. नेट प्रॉफिट 73,670 कोटी रुपये आहे, अशी माहिती मुकेश अंबानी यांनी दिली.
