#

Advertisement

Monday, August 28, 2023, August 28, 2023 WIB
Last Updated 2023-08-28T11:57:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राज्यावर दुष्काळाचं सावट ओढवल्यासारखी स्थिती

Advertisement

औरंगाबाद : राज्यात कोकण वगळता अनेक भागात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत. पुरेसा पाऊस न पडल्यामुळे अनेक ठिकाणी पीकं करपली आहेत. परिणामी राज्यावर दुष्काळाचं सावट ओढवल्यासारखी परिस्थिती आहे. राज्यात 1 जून ते 26 ऑगस्टदरम्यान 709.5 मिमी म्हणजेच सरासरीपेक्षा 8 मिमी कमी पाऊस पडला आहे.
मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 21 टक्के कमी पाऊस पडला आहे. मराठवाड्यात सरासरीपेक्षा 18 टक्के कमी पाऊस पडला आहे. विदर्भात सरासरीपेक्षा 9 टक्के कमी पावसाची नोंद झालीय. तर अहमदनगर जिलह्यात 34 टक्के, धुळे जिल्ह्यात 23 टक्के, जळगावात 14 टक्के कमी पाऊस पडला आहे. कोल्हापुरात 14 टक्के, नंदुरबारमध्ये 21 टक्के, नाशिक जिल्ह्यात 9 टक्के, पुण्यात 17 टक्के कमी पाऊस पडला आहे. सांगलीत 45 टक्के, साताऱ्यात 36 टक्के, सोलापुरात 27 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.
मराठवाड्यातील धरणांमध्ये पाणी पातळीत मोठी घट झालीय. मराठवाड्यात 8 जिल्ह्यांमधील 76 तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. पिण्याचं पाणीच कमी असल्यामुळे आता पिकांच्या सिंचनासाठीदेखील पाणी वापरावर बंधनं आली आहेत.