#

Advertisement

Monday, August 28, 2023, August 28, 2023 WIB
Last Updated 2023-08-28T12:37:06Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

'ही काय गंमत वाटली का?'

Advertisement

 न्यायाधिशांनी फटकारल्यानंतर राणा दाम्पत्य कोर्टात होणार हजर

मुंबई :  हनुमान चालीसा प्रकरणात न्यायाधिशांनी फटकारल्यानंतर आता राणा दाम्पत्य कोर्टात हजर होणार आहे. खासदार नवनीत राणा  आणि रवी राणा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हट्टाने हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मुंबई सत्र न्यायालयात हजर राहणार आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याचा आग्रह धरल्याप्रकरणी राणा दाम्पत्याला 10 ऑगस्ट रोजी मुंबई सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु राणा दाम्पत्याने हजेरी लावली नव्हती. या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. याआधी राणा दाम्पत्य या खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयात हजर राहिले नव्हते. या खटल्याची सुनावणी करणारे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी राणा दाम्पत्याला खडसावत न्यायपालिका हा चेष्टेचा विषय नाही, असे म्हटलं होतं.