#

Advertisement

Monday, August 7, 2023, August 07, 2023 WIB
Last Updated 2023-08-07T10:52:17Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अजितदादांना तिहार जेलमध्ये जायचं नव्हतं... !

Advertisement

सोलापूर | राष्ट्रवादीत 2 जून या दिवशी राजकीय भूकंप झाला अन् एकाच पक्षाचे दोन भाग झाले. अजित पवार यांचं समर्थन करणारा गट भाजपसोबत गेला. तर शरद पवार यांना मानणाऱ्या वर्गाने त्यांच्याच सोबत राहण्याचा निर्णय घेतला. पण अजित पवार यांनी हा निर्णय का घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला. त्याबद्दल अनेक तर्क वितर्कही लढवले गेले. या सगळ्यावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी  प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांना तिहार जेलमध्ये जायचे नसेल. तर त्यामुळे त्यांना भाजपसोबत जाणं भाग होतं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. शालिनीताई पाटील यांच्या प्रश्नाचं खंडण अजितदादा यांनी केलं नाही.हे उदाहरणं बोलकं आहे. त्यामुळे अमित शहा यांना यश का येते यातून कळत आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.शरद पवार हे सिनियर आहेत. वयोवृद्ध पुढारी आहेत. मात्र आता त्यांच्याकडे काय राहिलं आहे?, असा सवालही आंबेडकरांनी केला आहे.