#

Advertisement

Thursday, August 17, 2023, August 17, 2023 WIB
Last Updated 2023-08-17T13:14:36Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आंबेजोगाईचे सुंदर जोगदंड यांचे समाजासाठी मोठे योगदान

Advertisement

बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचे प्रतिपादन

आंबेजोगाई : राज्यात कुठेही मातंग समाजावर अन्याय, अत्याचार होत असेल तर मोठ्या धाडसाने त्या अन्यायाविरुध्द आवाज उठविण्याचे काम आंबेजोगाई येथील सुंदर जोगदंड यांनी केले आहे. आंबेजोगाई नगरपालिकेचे नगरसेवक असताना त्यांनी समाजासाठी भरीव योगदान दिले. समाजहिताची शासकीय योजना वेचून आणण्यापेक्षा खेचून आणण्याची धमक त्यांनी वेळोवेळी दाखवली आहे. साहेबांचे अत्यंत विश्‍वासू सहकाऱ्यांपैकी सुंदर जोगदंड यांचेही नाव घेतले जाते, त्यामुळे त्यांची भेट होणे हे माझ्यासाठी अहोभाग्य असल्याचे मी समजते, असे प्रतिपादन बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले.
बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचे आंबेजोगाई येथील खंदे समर्थक सुंदर जोगदंड हे आजारी असल्याचे कार्यकर्त्यांकडून समजल्यानंतर ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी इतर कामे रद्द करीत त्या जोगदंड यांच्या घरी पोहचल्या, याविषयी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या.
त्या म्हणाल्या की, सुंदर जोगदंड यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तेही भारावून गेले. यावेळी साहेबांसोबत केलेल्या कामाच्या अनेक जुन्या आठवणी त्यांनी सांगितल्या. बोलता बोलता त्यांचा कंठही दाटून आला होता. डोळे अश्रूंनी डबडबले होते. या सगळ्या आठवणी माझ्यासाठी ऊर्जास्रोत ठरल्या आहेत. या भेटीत जोगदंड कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधता आला याचे मोठे समाधान वाटते.
मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा असो किंवा समाजावर ओढवलेले कुठलेही संकट असो, फ्रंटलाईनवर राहून जोगदंड यांनी निकराचा लढा दिला. ढोबळे साहेबांच्या या लढवैय्या निष्ठावान कार्यकर्त्यानं संपूर्ण महाराष्ट्रात साहेबांसोबत राहून जुलमी व्यवस्थेविरोधात रान उठवले.
समाजासाठी लढणारी अशी अनेक माणसं साहेबांनी जोडली. फक्त जोडलीच नाहीत तर जीवाला जीव लावून जपली. कार्यकर्त्याच्या पाठीवर हात ठेवून लढ म्हणण सोपं असतं; पण त्याच्या कठीण काळात त्याला साथ देणंही तेवढंच महत्वाचं असतं. साहेबांनी कार्यकर्त्यांना ताकद दिलीच; त्याहीपेक्षा ते अडीअडचणीच्या काळात कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. आज बहुजन रयत परिषद तळागाळात रुजली आहे, हा त्यांनी केलेल्या कामाचा परिपाक असल्याचेही ऍड. कोमलताई यांनी स्पष्ट केले.