#

Advertisement

Thursday, September 21, 2023, September 21, 2023 WIB
Last Updated 2023-09-21T11:28:14Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महायुतीला 45 जागांवर यश मिळेल !

Advertisement

पुणे :  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौऱ्यावर आहेत. बावनकुळेंच्या उपस्थितीत आज भाजपच्या नवीन शहर कार्यकारणीची बैठक झाली. शिवाय बावनकुळे आज शहरातील प्रमुख गणेश मंडळांना देखील भेटी त्यांनी भेटी दिल्या. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचं पुणे शहर आणि जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे. त्यांच्या उपस्थितीत पुणे शहर भाजप कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला पुणे शहर भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते.
लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. निवडणुकीत आपल्याला यश मिळेल, असा दावा सत्ताधारी आणि विरोधकांकडून करण्यात येत आहे. भाजपकडूनही पुन्हा जिंकून येण्याचा विश्वास व्यक्त केला जातो. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर थेट आकडाच सांगितला आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला भव्य विजय मिळेल, असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकास करतोय. आगामी निवडणुकीत महायुतीला 45 जागांवर यश मिळेल, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
इंडियाने पत्रकारांवरच बहिष्कार घातला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत पत्रकार ही एनडीएच्या बाजूनेच मतदान करतील. मोदींचं नेतृत्व तुम्हाला ही मान्य असेल. काँग्रेस जनतेच्या मनात गोंधळ निर्माण करत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे. सगळीकडे त्यांना मान आणि महत्व आहे. पंतप्रधान मोदी कधीही चुकीचं निर्णय घेणार नाहीत, असं म्हणत बावनकुळे यांनी इंडियाआघाडीवर टीकास्त्र डागलं.