Advertisement
मुंबई : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्ताराच्या घडामोडींना वेग आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्या काळात बरेच दिल्ली दौरे देखील झाले होते. विशेष म्हणजे मंत्रिमंडळाच्या विस्तारातील नव्या मंत्र्यांची नावे देखील चर्चेत आले होते. पण आमदारांमध्ये नाराजी वाढेल म्हणून पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती समोर आली होती.
विधी मंडळाचं पावसाळी अधिवेशन संपुन आता बरेच दिवस लोटले आहेत. पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. विशेष म्हणजे दरम्यानच्या काळात विरोधात असलेले अजित पवार हे सत्तेतही सहभागी झाले आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि शिवसेना आमदारांमध्ये धुसफूस सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. राष्ट्रवादी पक्ष सत्तेत सहभागी झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची संख्या अर्थात कमी झाली. त्यामुळे आता मंत्रीपद कुणाला मिळेल? याबाबत उत्सुकता वाढली आहे.
याबाबत शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली लोकसभा ही भाजप पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी भाजप पक्ष पूर्ण ताकदीने कार्यक्रमाला लागलेला आहे. त्यामुळे सर्व आमदारांना लोकसभेच्या तयारीला लागा, अशा सूचना दिल्या आहेत. याचा अर्थ असा होत नाही की विस्तार होणार नाही. मंत्रिमंडळ विस्तार होईल की नाही याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील. विस्तार करावा लागेल पण याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील”, असंही संजय शिरसाट म्हणाले\
