#

Advertisement

Friday, September 22, 2023, September 22, 2023 WIB
Last Updated 2023-09-22T11:56:59Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अजितदादा आणि एकनाथ शिंदे भाजपच्या तिकीटावर लढणार !

Advertisement

मुंबई : एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अपमान केला जात आहे. दुसरीकडे मावळबद्दल बोलून अजितदादांना अडचणीत आणलं जात आहे. दोन्ही लोकनेत्यांचं अस्तित्व लोकसभेपर्यंत ठेवलं जाणार. त्यानंतर दोघांनाही संपवलं जाणार आहे. अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे दोघेही भाजपच्याच तिकीटावर लढतील, असं भाकीतच आमदार  रोहित पवार यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 2019 ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याचं तिकीट कोणी कापलं हे त्यांनीही सांगावं. आज बावनकुळे पडळकरांची बाजू घेत आहेत. पण त्यांची परिस्थिती काय झाली आणि कोणी केली याचा विचार व्हावा, असा टोला त्यांनी लगावला.
भाजपला कोणताही लोकनेता अडवत नाहीत. पंकजा मुंडे, भाऊसाहेब फुंडकर आणि आता नितीन गडकरी यांच्या बद्दल हेच झालं. मोहिते-पिचड यांच्या सारखं एकनाथ शिंदे यांचं होणार. आणि अजित दादांचंही तेच होतंय. शिंदेंच्या बाबतील स्टाईलने निर्णय घेतला जाईल. शिंदेना विधानसभा अध्यक्ष अपात्र ठरवणार नाहीत. पण कोर्टात जाणार आणि ते अपात्र होतील, असा दावाही आमदार  रोहित पवार यांनी  केला.