#

Advertisement

Friday, September 22, 2023, September 22, 2023 WIB
Last Updated 2023-09-22T11:45:39Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवार यांनी केली प्रफुल्ल पटेल यांची कानउघाडणी

Advertisement

नवी दिल्ली  : नव्या संसद भवनाच्या कॅफेटेरिया येथे प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्यासोबत फोटो काढलेला. पटेल यांनी हा फोटो सोशल मीडियावरही शेअर केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. अखेर या प्रकरणी शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांची कानउघाडणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
राज्यसभेचे 18 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर या चार दिवसांसाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं. या अधिवेशनाच्या निमित्ताने शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल दिल्लीत आले होते. दोन दिवसांपूर्वी शरद पवार राज्यसभेत पोहोचले तेव्हा प्रफुल्ल पटेल हे देखील पोहोचले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये फोटो सेशन झालं होतं. त्यानंतर प्रफुल्ल पटेले यांनी आपल्या अधिकृत ट्विरवर अकाउंटवर शरद पवार यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता.
प्रफुल्ल पटेल यांनी फोटो शेअर केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही या फोटोची चर्चा झाली होती. त्यानंतर संसदेचा काल शेवटचा दिवस होता. यावेळी प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार समोरासमोर आले. शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना काल तुम्ही जे फोटो काढले ते सोशल मीडियावर का शेअर केले? असा प्रश्न विचारला. त्यांच्या या प्रश्नावर पटेल यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.