Advertisement
मुंबई : आमदार अपात्र संदर्भात एका आठवड्यात सुनावणी घ्या आणि दोन आठवड्यानंतर काय कार्यवाही केली याची माहिती द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. तसेच चार महिन्यात काहीच कारवाई न केल्याबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या वेळकाढूपणावर तीव्र शब्दात नाराजी केली आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष कामाला लागले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राहुल नार्वेकर हे तातडीने दिल्लीला रवाना होणार आहेत. नार्वेकर आजच दिल्लीला जाणार आहेत. कोर्टाने अपात्र आमदारांबाबत तातडीने निर्णय घेण्याचे आदेश नार्वेकर यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नार्वेकर हे दिल्लीला जात असल्याचं सांगितलं जात आहे. नार्वेकर दिल्लीत ज्येष्ठ कायदे तज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. कायदेतज्ज्ञांशी बोलूनच ते पुढील निर्णय घेणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे नार्वेकर यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर नार्वेकर यांचा हा दौरा पूर्व नियोजित असल्याचंही सांगितलं जात आहे.