#

Advertisement

Friday, September 8, 2023, September 08, 2023 WIB
Last Updated 2023-09-08T12:06:30Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आमदार पदापर्यंत आपली प्रगती व्हावी. ताईंना मतदान म्हणजे योग्य व्यक्‍ती, सार्थ निवड

Advertisement

 


.........................................
पुणे : बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांची निवड झाली.... त्याबद्दल भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष.भ वि आघाडीचे भाई नितीन काळे यांनी दिलेल्या शुभेच्छा त्यांच्याच शब्दांत !
.........................................
आपण उच्चशिक्षित आहात आणि याचा फायदा आज महाराष्ट्रातील तरुण मुला-मुलींना होताना दिसत आहे. आपण कायदे तज्ज्ञ देखील आहात त्यामुळेच गोरगरिबांचे प्रश्‍न आपण योग्य पद्धतीने मांडू शकता. आपल्याकडे आलेला व्यक्ती काम झाल्यानंतर हसत जातो त्याला आनंद वाटतो. माझे अनेक वर्षाचे काम आदरणीय सरांनी व ताईंनी केले, हे वाक्‍य खूप मोलाचे ठरते. तुमच्याबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे ताईसाहेब माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला देखील आदरणीय साहेबांनी खूप मोलाची साथ दिली आहे. ताई साहेब तुम्ही देखील आम्हाला जेंव्हा जेंव्हा अडचण येईल तेंव्हा मदत करता. आनंद वाटतो आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा. परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ते आमदार पदापर्यंत आपली प्रगती व्हावी. आपल्याला मतदान म्हणजे योग्य व्यक्‍ती, सार्थ निवड असे सहज म्हणावे वाटते.
आपल्या कार्याच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्यांच्या बद्दल बोलावे तेवढे शब्द देखील अपुरे पडतीर्लें अशा आमच्या मार्गदर्शिका प्रेमळ स्वभावाच्या आदरणीय गुरुवर्य मार्गदर्शक माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे सर यांच्या विचारांवर काम करणाऱ्या ऍड. कोमल ताई साळुंखे ढोबळे यांची बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा पदी एकमताने निवड करण्यात आली. हे यश खरोखरच कौतुकास्पद आहे. संघटन कौशल्य कसे असावे हे आदरणीय ताईसाहेब यांच्याकडून शिकावे, सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये अन्याय होईल त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तत्काळ उपस्थित राहणाऱ्या, सर्वांना योग्य प्रकारे न्याय मिळवून देणाऱ्या, कर्तृत्व-नेतृत्व आणि वक्तृत्व या त्रिवेणी गुणांचा संगम असणाऱ्या आदरणीय सौ. कोमलताई आपण गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील अनेक गावे बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून पिंजून काढली आहेत, त्या गावातील अडचणी जाणून घेतल्या आहेत. रानामध्ये काम करणाऱ्या माय माऊलींना योग्य प्रकारचा न्याय तुम्ही दिला आहे, त्यांच्या हाताला काम देण्याचं कार्य देखील ताईसाहेब आपल्या माध्यमातून होत आहे.
आदरणीय सरांनी व सर्व पदाधिकाऱ्यांनी तुमच्यावर ही पुन्हा जबाबदारी सोपविली आहे. जीवनामध्ये काम करीत असताना अनेक अडचणी येतात त्या अडचणींवर मात करून आपण जनतेचे व सर्वसामान्यांचे प्रश्न कसे सोडविता येतील आणि त्यांना न्याय कसा मिळवून देईल, याकडे ताईसाहेब तुमचे पूर्णपणे लक्ष असते जेंव्हा जेंव्हा महाराष्ट्रातील अनेक मायमाऊलींना अडचणी येतात सामन्य कुटुंबातील व्यक्तीला विद्यार्थ्याला जेव्हा अडचणी येतात तेंव्हा आदरणीय साहेब आणि ताई आठवतात. कारण, मदत मागायला गेलेला सामान्य कुटुंबातील विद्यार्थी जेव्हा येतो तेव्हा त्या ठिकाणी त्याला योग्य प्रकारे न्याय दिला जातो त्याची अडचण सोडविली जाते, त्याला शिक्षणासाठी मदत केली जाते. साहेब म्हणतात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी तो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आदरणीय साहेबांनी मंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये अनेक कंपन्या, कारखाने काढले असते पण तसे न करता या राज्यामध्ये शैक्षणिक संस्था उभारण्याचे काम आदरणीय साहेबांनी केलं आणि आज आदरणीय सौ. कोमलताई देखील शैक्षणिक संस्थेचा कारभार योग्य रीतीने पार पाडत आहेत. सर्वांना शिक्षणाचे महत्त्व सांगत आहेत. वंचित घटकांना कसे शिक्षण देता येईल याकडे ताईसाहेब तुम्ही पूर्णपणे लक्ष देत आहात, हे कौतुकास्पद असून अभिमानाची बाब आहे.
मी स्वतः गेल्या अनेक वर्षांपासून पाहतोय आदरणीय ताईसाहेब रात्रीचा दिवस करत आहे एक दिवस असा नाही की, ताईसाहेब स्वतःसाठी वेळ देत आहेत. दररोज एक जिल्हा, काही तालुके बहुजन रयत परिषदेच्या संघटनेसाठी तेथील कार्यकर्त्यांसाठी पदाधिकाऱ्यांसाठी ताई साहेब तुम्ही तिथल्या प्रत्येक गावातील अडचणी सोडवण्यासाठी 24 तास काम करीत आहात. आपल्या कार्याला तोड नाही, या राज्यातील माय माऊलींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगली संधी सर्वांच्या आशीर्वादाने मिळेल, यात शंका नाही. आपण करीत असलेले कार्य हे सर्वांनाच माहित आहे. आपण केलेले संघटन कौशल्य आणि त्यातून जोडलेली माणसे आणि त्यांना अडचणीच्या काळात दिलेली साथ ही जनता कधीच विसरू शकत नाही.