Advertisement
यशोमती ठाकूर यांचा गंभीर इशारा
अमरावती : काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघात काँग्रेसने काल जनसंवाद यात्रा काढली. गाडगेबाबांची निर्वाणभूमी असलेल्या वलगावमधूनग ही जनसंवाद यात्रा निघाली. जनसंवाद यात्रेत यवतमाळमधील कलावती बंदूरकर देखील सहभागी झाल्या होत्या. यावर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी जोरदार टीका केली. यशोमती ठाकूर यांनी रवी राणांकडून पैसे घेऊन दुसऱ्याचा प्रचार केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला. या सगळ्याला यशोमती ठाकूर यांनी उत्तर दिलं आहे. राणा दाम्पत्याने आपल्या औकातीमध्ये राहावं. हे सहन करून घेतलं जाणार नाही, असा गंभीर इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला.
लोकसभा निवडणुकीत रवी राणा कडून कडक नोटा घेतल्या. रक्ताचे अश्रू काढण्याचं तुम्ही काम केलं आणि प्रचार दुसऱ्याचा केला, असं म्हणत खासदार नवनीत राणा यांची नाव न घेता माजी मंत्री, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केली आहे. त्याला प्रतित्यूत्तर देताना यशोमती ठाकूर बोलत होत्या. त्या म्हणाल्या , रवी राणांनी औकातीमध्ये राहावं. माझ्या वडिलांनी जमिनी देण्याचं काम केलं आहे. रवी राणा तू चोर आहे. तुझी बायको चोर आहे. पैसे घेतले असेल तर सिद्ध करून दाखवा राजकारण सोडेल. हे सहन करून घेणार नाही, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत. आम्ही काँग्रेस पक्षाला सर्वस्व माननारी माणसं आहोत. काँग्रेस आमच्या रक्तात आहे. काँगेसच्या पलीकडे आम्ही दुसरा कोणताच विचार करत नाही, असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्याच्या टीकेला उत्तर दिलं आहे.