Advertisement
पत्रकार परिषदेत घेत केली पोलीस यंत्रणेची पोलखोल
सोलापूर : सोलापुरातील अवैध धंद्याच्या विरोधात बहुजन रयत परिषदेने रणशिंग फुंकले आहे. याच पार्श्वभूमीवर बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांन आज पत्रकार परिषद घेत सोलापूर पोलिय यंत्रणेची पोलखोल केली. पोलिसांच्या "कोटी-कोटी आशिर्वादाने'च सोलापुरात बेकायदेशीर धंद्याच्या आडून फोफावलेली गुन्हेगारी सोलापूरच्या दृष्टीने मोठ्या चिंतेची बाब झाली आहे. या मटका, जुगार, डान्सबार अशा अवैध धंद्यांना पोलिसांचाच वरदहस्त असल्याने राज्य सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. तातडीने आदेश काढून अवैध व्यावसाय बंद करावेत, संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांची खाते निहाय चौकशी करावी, अशी मागणी ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री दवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहेत. आज, पत्रकार परिषेत घेत त्यांनी ही माहिती दिली.सोलापूर शहराला सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांनी विळखा घातला आहे. याच कारणातून सोलापूर शहराची प्रतिमा मलिन होत आहे. यातून नवे उद्योग शहरात, जिल्ह्यात येत नाहीत. सोलापूरात मटका, जुगार आणि डान्सबार फोफावले आहेत. पत्त्याचे जुगार अड्डे, हातभट्टी दारू यावर कारवाई होण्याऐवजी पोलिसांकडून दुर्लक्ष होत आहे.
याशिवाय गुटखा विक्री, अवैध सावकारी, अंमली पदार्थांची विक्री, चोरटी वाळू वाहतूक, ओव्हरलोडेड ट्रकची वाहतूक अशा अनेक बेकायदेशीर बाबींकडे सोयीस्कररित्या पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. या बेकायदेशीर धंद्यांमुळे सोलापूरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. बेकायदेशीर धंद्यांच्या आडून फोफावत जाणारी गुन्हेगारी सोलापूरच्या दृष्टीने चिंतेची झाली आहे. अवैध धंद्यातून होणारी हाणामारी, दमदाटी, सर्वसामान्य नागरिकांना धमकावणे असे प्रकार दररोज घडत असताना शहर पोलीस मात्र हाताची घडी आणि तोंडवर बोट, अशी गळचेपी भूमिका घेत आहे. पोलीस यंतणेचे "हात ओले' केल्यामुळेच कारवाई होत नसल्याचे नागरिक तसेच खद्द अवैध धंदे करणारेच उघडपणे सांगत असतील तर सोलापुरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे, असेच म्हणावे लागेल.
सोलापूर शहरात चालणाऱ्या अवैध धंद्यांत पोलिसांचीच "पार्टनशीप" आहे की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेले पोलिसच जर अवैध धंद्यांना पाठीशी घालत असतील तर सोलापूर शहरात शांतता कशी नांदणार? सोलापुरातील सर्वसामान्य नागरिक हा बहुतांश कामगार वर्गातील आहे. या कामगारांवर मटका, जुगार, सट्टा, हातभट्टी दारू, गुटखा-माव्याची विक्री, अमली पदार्थांची विक्री याचा वाईट परिणाम होत आहे. पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे सोलापूर शहराचे नाव बदनाम झाले आहे. त्यामुळे मा. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण सोलापूरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करून ते कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश सोलापूर पोलीस आयुक्तांना द्यावेत, पोलीस यंत्रणेची खाते निहाय चौकशी करावी, ही नम्र विनंती, असे ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी निवेदनात नमूद कले आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही देण्यात येणार आहे.