Advertisement
मंगळवेढा : भारतीय जनता पक्षाची राज्यस्तरीय कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच जाहीर केली. यामध्ये माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांची प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली. भाजपने दिलेली मोठी जबाबदारी स्विकारल्यानंतर लक्ष्मणराव ढोबळे (साहेब) हे प्रथमच मंगळवेढा तालुक्यात आले होते. यावेळी भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदी निवड झाल्याबद्दल मंगळवेढा तालुका मागासवर्गीय वसतीगृह कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रा. ढोबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष तसलीम आकुंजी, सुशील मेंडगुडली, वाघमारे सर, गायकवाड मॅडम, अनिल कांबळे, माळी सर, गवळी सर, दत्ता गायकवाड, विलास पवार, भिवा पवार यांच्यासह कर्मचारी , मान्यवर उपस्थित होते.
