Advertisement
भाजपचे राज्य प्रवक्ते लक्ष्मणराव ढोबळे यांची ठाकरे कुटंबावर टीका
पंढरपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांना अवघ्या जगाने मान्यता दिली. त्या वाघनखांबद्दल गेली ५० वर्ष भगव्या झेंड्याच्या सावलीखाली अध्यात्माची लोकशाही मांडणारे याला विरोध करीत आहेत. चुकीचे बोलत आहेत. बाप चोरीला गेला आहे म्हणत आहेत. चिन्ह गेले, आमदार गेले, पक्ष गेला तरी पिता-पुत्र ऊर बडवून, ढोल वाजवताहेत आणि सरकारला बदनाम करत आहेत, अशी टीका भाजपचे राज्य प्रवक्ते लक्ष्मणराव ढोबळे यांनी ठाकरे कुटंबावर केली आहे.
पंढरपूर येथे आल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे कुंटुंबावर टीका केली. यावेळी शरद अडगळे, रवी अडगळे, श्रीमंत मस्के, समाधान वाघमारे उपस्थित होते.
लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की, लाख गेले तरी लक्षावधी मिळतील, परंतु लक्षावधींचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणून बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड लढविली. भगव्या झेंड्याच्या सावलीखाली अध्यात्माची लोकशाही ज्यांनी मांडली, तेच आज छत्रपतींच्या भगव्याला विरोध करत आहेत, अशी टीका ढोबळे यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर केली.