#

Advertisement

Monday, October 2, 2023, October 02, 2023 WIB
Last Updated 2023-10-02T17:23:20Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मंगळवेढा येथे अपघातानंतर रस्त्यावर ठिय्या आंदोलन

Advertisement


प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

मंगळवेढा : शहरात अवजड वाहतूक बंद करण्याच्या मागणीनंतरही नगरपरिषद तसेच पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज सकाळी सद्गुरु बैठकीसाठी दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्यास एम.एस.ई.बी.जवळ पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोने (क्र. केए 63 7613) ने पाठीमागून धडक दिल्याने चोखोमेळा नगरमधील कमल पांडुरंग साळुंखे (वय 53) यांचा जागीच मृत्यू झाला तर पती पांडुरंग साळुंखे हे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर संतप्त झालेल्या शहरातील नागरिकांसह माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करीत प्रशासनाने चालढकल केल्यामुळे या महिलेच्या मृत्यूस जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी रस्त्यावर ठिय्या आंदोलनामुळे शहरात येणारी वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या या आंदोलनामध्ये माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासह अजित प्रकाश गायकवाड, विनायक कलुबर्मे, राहुल सावजी, युवराज घुले, अजय आदाटे, सूदर्शन यादव, प्रफुल्ल सौंमदळे, सुहास पवार, सतीश दत्तू, बापू मेटकरी, शरद हेंबाडे, विठ्ठल गायकवाड, दिलावर मुजावर, ज्ञानेश्वर कौडूभैरी, पांडुरंग नकाते, हर्षद डोरले यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

ढोबळे यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले
पंढरपूर रोडवर साडेचार मीटर उंचीच्या कमान उभारण्याची कारवाई केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता तर प्रशासनाचा ही बाब शक्‍य होत नसेल तर आपण साडेचार मीटर उंचीची कमान स्वखर्चातून करून देऊ असे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.

गोवे आणि वारी परिवराचे सतत प्रयत्न
शहरात येणारी अवजड वाहतूक पंढरपूर बायपास मार्गे वळवण्यात यावी या मागणीसाठी नारायण गोवे व वारी परिवार हे सातत्याने प्रयत्न करीत होते. शांतता कमिटीच्या बैठकीत देखील हा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. तसेच, बाह्यवळण मार्गावर पंढरपूर रोड घाडगे कनेक्‍शन येथे व विजापूर रोड पुलाजवळ मंगळवेढा पोलीस स्टेशनकडून होमगार्डची नेमणूक तातडीने करणे. सप्टेंबर 2023 अखेरपर्यंत शहरातून जड वाहतुकीस मनाई असल्याचे मराठी, हिंदी, इंग्रजी मधील बोर्ड तयार करून लावणे तसेच मंगळवेढा नगरपरिषदेकडून प्रकाश परावर्तित होणारे रबरी गतिरोधक बसविण्यात येणार असल्याचे लेखी पत्र देण्यात आले होते परंतु, यापैकी कोणतेही काम झाले नाही.