Advertisement
पुणे : पुणे मेट्रोला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मार्गावर असलेल्या भोसरी मेट्रो स्टेशनच नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी जनतेतून झाली नाही तर महामेट्रोनेच केली आहे. महामेट्रोने पुढे जाऊन केंद्रीय मंत्रालयाकडे पत्र लिहिले आहे. पिंपरी-चिंचवड मुख्यालय ते शिवाजीनगर कोर्ट या मार्गावरील भोसरी स्टेशन आहे. परंतु मेट्रो स्टेशनपासून भोसरी पाच किलोमीटरवर आहे. स्टेशन ज्या ठिकाणी आहे त्या भागाला नाशिक फाटा नावाने ओळखले जाते. भोसरी या ठिकाणाहून पाच किलोमीटर दूर असल्यामुळे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.