#

Advertisement

Friday, November 24, 2023, November 24, 2023 WIB
Last Updated 2023-11-24T12:36:23Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

10 रुपयांचं नाणं झालं बंद?

Advertisement

लातूर : जिल्ह्यात प्रचलित दहा रुपयाच्या नाण्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. इथले ग्राहक व्यापाऱ्यांकडून 10 रुपयांचे नाणे स्वीकारत नसल्याचे समोर आले आहे. 10 रुपयांचे नाणे बंद झाले आहे, त्यामुळे आम्ही घेणार नाहीत असे ग्राहकांकडून व्यापाऱ्यांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये डोकेदुखी वाढली.हे प्रकरण इतक्या टोकाला गेले की जिल्हा प्रशासनाला यामध्ये लक्ष घालावे लागले आहे. काय आहे हे प्रकरण? या घटनेचे पडसाद कसे पडतायत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. लातूर जिल्ह्यात सध्या प्रचलित असलेल्या दहा रुपयाच्या नाणे बंद असल्याची अफवा पसरली आहे. दरम्यान यामुळं प्रचलित असलेले दहा रुपयाचे नाणे हे लातूर जिल्ह्यातील बाजारात व्यापाऱ्याकडून आणि ग्राहकाकडून बंद झाल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे प्रचलित असलेले नाणे हे व्यवहारात स्वीकारले जात नसल्याने व्यापाराची आणि ग्राहकाची डोकेदुखी वाढली आहे.