Advertisement
'त्या' व्हायरल व्हिडीओवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
अमरावती : भाजपा नेत्या पंकजा मुंडे त्यांच्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी आपल्याला चष्मा लागल्याची माहिती देताना हा व्हिडीओ तयार केला होता. इतरवेळी पक्षातील खदखद सांगणाऱ्या पंकजा मुंडे त्यांच्या या मजेशीर व्हिडीओमुळे चर्चेत आल्या आहेत. सरप्राईज तुमच्या ताईला चष्मा लागला. आता जवळचं स्पष्ट दिसेल, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला होता. अशातच आता पंकजा मुंडेंच्या व्हिडीओवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमरावतीमध्ये बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करण्याची इच्छा पुन्हा महादेव जानकर यांनी वक्त केली आहे. यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता त्यांनी जानकर यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. महादेव जानकर यांना गोपीनाथ मुंडे यांनी भाजपशी जोडले. ते मुंडे कुटुंबाचे सदस्य आहेत. त्यामुळे अशा प्रकारची प्रतिक्रिया देणे हे चुकीचे नाही. लोकशाहीमध्ये तेवढा आकडा जोडला की करता येते असे मत चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवले आहे.
