Advertisement
जगातील सर्वात महागडा स्मार्टफोन
मुंबई : रिलायन्स कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब हे केवळ भारतामधील नाही तर आशियामधील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे. अंबानी कुटुंबीय हे आलिशान लाईफस्टाइलसाठीही ओळखलं जातं. जगातील सर्वात महागड्या घरामध्ये म्हणजेच 'अॅण्टीलिया'मध्ये राहणाऱ्या अंबानी कुटुंबाबद्दल अनेक समज गैरसमज सर्वसामान्यांमध्ये आहेत. अनेकदा अंबानी कुटुंबाकडे असलेल्या महागड्या वस्तूंची चर्चा सोशल मीडियापासून पापाराझींपर्यंत सर्वच वर्तुळामध्ये दिसून येते. देशातील सर्वात महागड्या गाड्यांचा ताफा असो, कार्यक्रम असो किंवा एखादा दैदिप्यमान सोहळा असो अंबानींच्या आलिशान राजेशाही थाटाची चर्चा कायमच असते.
नीता अंबानी यांच्याकडे जगातील सर्वात महागडा फोन असल्याचा दावा करण्यात आलेला. नीता अंबानी या जगातील सर्वात महागड्या स्मार्टफोनच्या मालकीण असल्याच्या या चर्चांवर सर्वसामान्यांनी सहाजिकच लगेच विश्वास ठेवला. अनेक बातम्यांमध्ये नीता अंबानींकडे गोल्ड प्लेटेड आयफोन असून या आयफोनच्या मागील बाजूस हिरा बसवण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.
सत्य काय?
जगातील सर्वात महागड्या घरात राहणाऱ्या नीता अंबानींकडे एवढा महाग फोन असूच शकतो यावर कोणीही विश्वास ठेवेल. या फोनची किंमत 400 कोटी रुपये असल्याचाही दावा केला गेला. मात्र हा दावा खरा नाही. नीता अंबानींच्या नावाने व्हायरल झालेली ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. 'रिलायन्स'मधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नीता अंबानींकडे पिंक फॅल्कॉन फोन नाही. नीता अंबानी नेमका कोणता फोन वापरतात याची माहिती उपलब्ध नाही.