Advertisement
भुजबळ-जरांगें वाद आणखी चिघळला
मुंबई: छगन भुजबळ-मनोज जरांगे वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागतं या मनोज जरांगेंच्या विधानावर भुजबळांनी हिंगोलीच्या सभेतून जोरदार प्रहार केला. मनोज जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा एकदा जुंपलीय. राज्यात नवीन वर्णव्यवस्था यायला लागली आहे.आता लायकी काढली जातेय असं विधान भुजबळांनी केले. मात्र, यावरुनच मनोज जरांगेंनी भुजबळांवर पलटवार केलाय. तुमच्या मनात विष आहे. महापुरुषांपेक्षा तुम्ही मोठे आहेत का? असा सवाल जरांगेंनी भुजबळांना केला
जरांगेंनी लायकी शब्द मागे घेतला
भुजबळांच्या या विधानानंतर जरांगेंनी लायकी शब्द मागे घेतला. विनाकारण जातीय रंग दिला जात असल्यामुळे शब्द मागे घेत असल्याचं जरांगेंनी म्हटले. जरांगेंनी शब्द मागे घेतला तरी भुजबळ काही थांबायला तयार नाहीत. आता राज्यात नवीन वर्णव्यवस्था यायला लागलीय असा घणाघात भुजबळांनी केलाय. या टीकेनंतर जरांगेंनी पुन्हा एकदा भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला.