#

Advertisement

Wednesday, November 29, 2023, November 29, 2023 WIB
Last Updated 2023-11-30T02:26:59Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

नाशिकमध्ये स्व. सौ. अनुराधाताई यांना अभिवादन

Advertisement




नाशिक : स्व. सौ. अनुराधाताई लक्ष्मण ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त बहुजन रयत परिषद नाशिक शहर आणि श्री.नारायणी वारकरी शिक्षण संस्था त्रंबकेश्वर (मुलींची) वतीने प्रतिमा पूजन आणि अभिवादन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. स्वर्गीय सौ. मातोश्री अनुराधा ताई ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त श्री.नारायणी वारकरी शिक्षण संस्था त्रंबकेश्वर च्या संस्थापिका युवा कीर्तनकार हभप कु.खुशाली महाराज उगले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन बहुजन रयत परिषदेचे नाशिक शहराध्यक्ष अंबादास आहिरे यांनी केले होते. स्व.सौ.अनुराधा ताई ढोबळे यांच्या जीवन आणि कार्याबद्दल माहिती देऊन त्यांनी आदरांजली अर्पण केली.या वेळी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनींनी सामूहिक  पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली.