Advertisement
ह.भ.प.गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांचे प्रतिपादन
मंगळवेढा : राजकारणात असूनही समाजकारण जवळ करणारे प्रा.लक्ष्मणराव ढोबळे सरांनी मंगळवेढ्यात संस्कृतीक व सांप्रदायीक वातावरण टीकवले. संतांच्या पावन भूमीचे पावित्र्य टीकवण्याचे काम ढोबळे सरांनी केले आहे. कामातच राम शोधणारे लक्ष्मण यांना स्व.अनुराधाताई यांनी मोलाची साथ दिली. मंगळवेढा व मोहोळ मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला असून, राजकारणात दहा टक्के राजकारण आणि नव्वद टक्के समाजकारण करत ते जनतेच्या विश्वासास पात्र ठरले आहेत. म्हणूनच त्यांना लाभलेला सामान्यांचा आशीर्वाद हिच खरी त्यांनी निर्माण केलेली मोठी संपत्ती व ओळख असल्याचे प्रतिपादन ह.भ.प.औसेकर महाराज यांनी केले.
शाहु शिक्षण संस्था व सावली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बहुजन रयत परिषदेतर्फे सदर "अनुसंध्या' या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कीर्तनात ते मार्गदर्शन करीत होते. हा किर्तन सोहळा मंगळवेढा येथील शिशुविहार समोरील, शाहु ग्राऊंड येथे झाला. यावेळी ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा माजी मंत्री तथा शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी बहुजन रयत परिषदेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड.कोमलताई साळुंखे-ढोबळे आपले मनोगत व्यक्त केले.
औसेकर महाराज म्हणाले की,कोणतेही वैभव उभे राहायला सुध्दा पाठीमागे खंबीर साथ असायला हवी आणि तीच साथ प्रा.ढोबळे सरांना अनुराधाताईंनी दिल्यामुळेच आज हा शाहू परिवाराचा वटवृक्ष झाला आहे.मंगळवेढ्याच्या भुमीने कायमच सांप्रदायिक क्रांती घडवली असून या भुमीने आपल्याला अजरामर असे संत दिले आहेत त्यामुळे आमच्या सारखे लाखों वारकरी या मंगळवेढ्याच्या भुमीत कायमच नतमस्तक होतात.
प्रा.ढोबळे सरांनी सत्तेत आमदार,मंत्री असताना उपेक्षित व दुर्लक्षित वर्गासाठी मोठं काम केलं आहे. त्यांच्या कामाचा वेग मी स्वतः पाहीला आहे.आपल्या कामातच राम शोधणारा हा लक्ष्मण आज सर्वांपेक्षा श्रेष्ठ वाटतो.धर्माचे व जनतेचे पालन करणारे लक्ष्मण म्हणजे ढोबळे सर आहेत. प्रजेचे हित करणाऱ्यालाच राजा म्हणतात. त्याप्रमाणे लोकशाहीमध्ये सर्वसामान्यांच्या अडचणीत धावून जाणारे व सर्वांगीण विकासासाठी झटणारे नेते म्हणूनही प्रा.ढोबळे सर आज आदर्श आहेत.कारण ज्याचं मन ढोबळ असतं तो कधीच पापी नसतो असे अनेकांना सामाऊन घेणारे आपले प्रा. ढोबळे सर आहेत असेही महाराज यांनी सांगितले.जर माणूस काशीमध्ये प्रज्ञावंत होत असेल तर मंगळवेढ्याच्या मातीत सुध्दा माणूस प्रज्ञावंत व भाग्यशाली होतो आहे आम्ही पाहीले आहे.या मंगळवेढ्याच्या मातीत जन्म घ्यायला मोठं भाग्य लागतं असेही ते म्हणाले.जगाला शांतीचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर हे जरी कर्नाटकात जन्मले असले तरी त्यांची कर्मभुमी ही मंगळवेढा आहे.त्यांच्या कार्याची ही क्रांती या भुमीत घडली आहे.त्यामुळे ही भुमी अजरामर झाली आहे असेही शेवटी ह.भ.ष.औसेकर महाराज यांनी सांगितले. यावेळी तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते