#

Advertisement

Saturday, November 18, 2023, November 18, 2023 WIB
Last Updated 2023-11-18T13:37:54Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

कार्तिकी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरात झिका व्हायरस....

Advertisement

पंढरपुर :  कार्तिकी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरात जीवघेण्या झिका व्हायरसनं शिरकाव केला आहे. पंढरपुरात शहरात झिका व्हायरसचा रुग्ण सापडल्यानं आरोग्य विभागाची धावपळ सुरु झाली आहे. 23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. यात्रेसाठी राज्यासह परराज्यातून सुमारे सात ते आठ लाख भाविक येतील असा अंदाज आहे. यात्रेची तयारी सुरू असतानाच बाहेरगावहून पंढरपूर शहरातील एका व्यक्तीला झिका व्हायरसची लागण झाली. त्यामुळे हिवताप विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत, पंढरपूर शहरातील मठ-धर्मशाळांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
दरम्यान, पंढरपुरात झिका आजाराविषयी जनजागृती केली जातेय. बाधित परिसरात हिवताप विभागानं कंटेनर सर्व्हे केलाय, काही जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतलेत. परिसरातील गरोदर महिलांची तपासणी सुरू केलीय. वारक-यांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यता आलंय. यात्रेची तयारी सुरू असतानाच कोल्हापूर, पुणे नंतर पंढरपूर शहरातील एका व्यक्तीला झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आल्याने आता प्रशासनाने कंबर कसली आहे.