#

Advertisement

Tuesday, November 21, 2023, November 21, 2023 WIB
Last Updated 2023-11-21T12:45:38Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी

Advertisement


चंद्रपूर 
: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना  जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे फडणवीस आणि मुनगंटीवार यांना उघडपणे सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन धमकी देण्यात आली आहे. संबंधित धमकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भातील बाबा मस्की आणि शोभा मस्की या दाम्पत्याकडून धमकी देण्यात आली आहे. या दाम्पत्याकडून व्हिडीओत शिवीगाळ देखील करण्यात आलीय. तसेच फडणवीस आणि मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात राहणाऱ्या आणि विविध आंदोलनात सतत सहभागी होणाऱ्या बाबा मस्की आणि शोभा मस्की या दाम्पत्याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओत देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या राजुरा येथील कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी संबंधित व्हिडीओची गंभीर दखल घेतली आहे.