#

Advertisement

Tuesday, November 21, 2023, November 21, 2023 WIB
Last Updated 2023-11-21T12:50:23Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

रोहित पवार यांचा कट्टर समर्थक भाजपाच्या वाटेवर

Advertisement

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ग्राम पंचायत निवडणुकीनंतर एकापाठोपाठ एक धक्के बसू लागले आहेत. कर्जत-जामखेड मतदार संघातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे.  रोहित पवार यांचे आणखी एक कट्टर समर्थक भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यांनी आमदार राम शिंदे यांची भेट घेतली. मागच्याच आठवड्यात जवळा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच सुशिल सुभाष आव्हाड यांनी भाजपात प्रवेश केला. जवळा ग्रामपंचायत ही स्थानिक आघाडीने जिंकली होती. सरपंच सुभाष आव्हाड यांनी राम शिंदे यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला होता. युवा नेते प्रशांत शिंदे यांनी देखील भाजपात प्रवेश केला होता.
रोहित पवार यांचे कट्टर समर्थक परमवीर पांडुळे यांनी भाजप आमदार राम शिंदे यांची भेट घेतली आहे. परमवीर पांडुळे हे मिरजगांव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. पांडुळे यांनी राम शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पांडुळे हे लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रोहित पवार यांच्यासाठी हा धक्का आहे.