#

Advertisement

Wednesday, November 22, 2023, November 22, 2023 WIB
Last Updated 2023-11-22T11:30:54Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

देहू येथे संत तुकाराम महाराजांचे बागेश्वर बाबांनी घेतले दर्शन

Advertisement


देहू :  संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर बाबा यांचा पुण्यात दरबार भरलेला आहे. बाबांच्या भक्तांनी पुण्यात मोठी गर्दी केली आहे. बागेश्वर बाबांनी आज देहू येथे संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरही त्यानी प्रतिक्रीया दिली.
बागेश्वर बाबा यांनी काही दिवसांआधी संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी मारायची असे वादग्रस्त वक्यव्य केले होते. यानंतर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका झाली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरून युटर्न घेत जाहीर माफी मागितली होती. सध्या पुण्यात बागेश्वर बाबाचा दरबार भरला आहे. या दरबारात अनेक राजकीय नेतेही आपली हजेरी लावताना दिसत आहे.
बागेश्वर बाबा यांनी देहू स्थित तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिराच्या भव्य बांधकामाचे कौतूक केले. काही दिवसांआधी त्यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर त्यांना आज पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, तुकाराम महाराजांबद्दल तसं माझ्या बाचण्यात आले होते म्हणून मी ते बोललो असं ते म्हणाले. यासाठी मी पुन्हा एकदा समस्त वारकरी सांप्रदायाची माफी मागतो असं बागेश्वर बाबा म्हणाले. आज देहू येथे बागेश्वर बाबा येणार असल्याने पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.