Advertisement
पुणे : बागेश्वर बाबाच्या दरबारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले. पुण्यात बागेश्वर बाबाचा दरबार भरला आहे. या दरबारात फडणवीस यांनी देखील हजेरी लावली. देवेंद्र फडणवीस यांनी बागेश्वर बाबाच्या गळ्यात हार घालून त्यांना हात जोडून अभिवादन केले. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते चंद्रकात पाटील देखील बागेश्वर बाबाच्या दरबारात पोहचले.
या दरबारात जाऊन फडणवीसांनी बागेश्वर बाबाची भेट घेतली. हार आणि शाल घालून फडणवीसांनी बागेश्वर बाबाचा सत्कार केला. सनातन धर्म हा सगळ्यांना जोडणारा चिरंतन धर्म आहे, असं फडणवीसांनी म्हटलं .
मंगळवारी वादग्रस्त धिरेंद्र शास्त्रींच्या पुण्यातील दरबारात सेवेवर तैनात पोलीस अधिकारी नतमस्तक झाल्याचं दिसले. कार्यक्रमस्थळी बंदोबस्तावर हे पोलीस अधिकारी होते. तिथे त्यांनी बागेश्वर बाबासमोर येऊन व्यथा मांडली.
2 महिन्यापुर्वी नागपुरातही बागेश्वरबाबांचा कार्यक्रम भरवण्यात आला होता. तिथे फडणवीसांनी हजेरी लावली होती. त्यामुळे संभाजीनगरच्या कार्यक्रमात फडणवीस येतील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र फडणवीसांनी ऐनवेळी दौरा रद्द केल्यानं चर्चांना उधाण आलंय. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या पुढाकारातून शहरात धीरेंद्र शास्त्री यांची रामकथा आणि दरबार भरवण्यात आला होता.
