Advertisement
भाजपाचे प्रवक्ते लक्ष्मणराव ढोबळे यांची आरक्षणावर मोठी प्रतिक्रीया
सोलापूर : मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे आणि ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही यावरुन गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील राजकारण पेटले आहे.तर दोन्ही समाजात तेढ वाढत चालला आहे. यासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी एकत्रित बसून शांततने तोडगा काढावा, असा सल्ला माजी मंत्री आणि भाजपाचे प्रवक्ते लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिला आहे.
प्रवक्ते लक्ष्मणराव ढोबळे हे काल सोलापूर दौर्यावर होते यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. यावेळी बोलताना ढोबळे यांनी राज्यात अनेक समाज गुण्यागोंविदान अनेक वर्षापासून नांदत आहे. मात्र, या आरक्षणाच्या मुद्दयावरुन आता दोन समाजात तेढ वाढत चालला आहे. गावगाड्यात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच राज्याची शांतता आणि सुव्यवस्था ही धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दोन्ही समाजाला येाग्य न्याय मिळावा अशीच आपली भावना आहे. कोणाच्या ही अधिकारावर गदा येणार नाही तसेच ओबीसींच्या ही आरक्षणाला धक्का लागणार नाही याचा विचार विनिमय करण्यासाठी आता दोन्ही नेत्यांनीच एकत्रित बसून मार्ग काढावा असा सल्ला प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिला आहे.