Advertisement
स्वामी समर्थ मंदिरात पौर्णिमेचा सोहळा
सोलापूर : जुनी पोलिस लाईन येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बहुजन रयत परिषदेच्या कोमल ढोबळे यांच्या हस्ते महाआरती करून अन्नदान केले. यावेळी भाविकांकडून दीपोत्सव साजरा केला. गेल्या ३० वर्षांपासून बार्शीहून पायी चालत आलेल्या श्री स्वामी समर्थ दिंडीच्या मुक्कामावेळी स्वरध्यास गायन विद्यालयाच्या सानिका कुलकर्णी, रसिका कुलकर्णी, अक्षय भडंगे यांचा स्वामींच्या भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिर विविध फुलांनी सजविण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर समितीचे संस्थापक गोरखनाथ डोंगरे, अध्यक्ष प्रमोद डोंगरे, जगदीश नायर, संतोष शिंदे, मंगल भोसले, सरला डोंगरे, निमिषा वाघमोडे, कविता गुलमिरे, आशा घायाळ, सुशीला गवळी, गौरी डके, अनिल सोमवंशी, रूपेश शिंदे, समृद्ध डोंगरे, राजू ढोबळे, विकास गुलमिरे, कृष्णा घाडगे, ऋतुराज भोसले, जय सुरवसे यांनी परिश्रम घेतले.