Advertisement
मुंबई : महाराष्ट्रात आणि मुंबई शहरात बहुतांश दुकानांची नावे हिंदी किंवा इंग्रजी भाषेत दिसतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बऱ्याच काळापासून या विरोधात भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी भाषेतून पाटी लावावी, अशी मागणी मनसेतर्फे करण्यात येत आहे. दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी मनसेतर्फे आंदोलनही करण्यात आलं आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर असून दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यासाठी 25 नोव्हेंबर पर्यंतची मुदतही देण्यात आली होती. याचीच आता मनसेने पुन्हा आठवण करून दिली आहे. तसेच 25 नोव्हेंबर पर्यंत दुकानांची नाव मराठीत झाली नाही तर.. खळ्ळखट्याकचा इशाराही मनसेतर्फे देण्यात आला आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. X ( पूर्वीचे ट्विटर) या मायक्रोब्लॉगिंग साईटवर त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. ” आधी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला निकाल आणि नंतर सर्वोच्च न्यायालयानं सांगितल्याप्रमाणे २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत महाराष्ट्रातील दुकानांच्या पाट्या ह्या मराठीत व्हायला हव्या आहेत. त्याला आता ५ दिवस उरले आहेत.
