Advertisement
पुणे : मराठी लोकांच्या अस्मितेचा फज्जा उडविण्याचे पाप दिल्लीतली अदृश्य शक्ती करत आहे. त्या अदृश्य शक्तीला महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे आहे. महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे नुकसान कसे होईल याचा प्रयत्न सुरू आहे. फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेना नाही तर गडकरी आणि फडणवीस यांनाही तसेच वागवले जाते, असं मोठं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं.
आमदार निलेश लंके यांनी पवार कुटुंब एकत्र आले पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर बोलतान त्या म्हणाल्या, पवार कुटुंब हे एकचं आहे. आमची लढाई ही वैचारिक आहे, वैयक्तिक नाही. सातत्याने मी माझी भूमिका यासंदर्भात स्पष्ट केली आहे. त्यामुळं वैचारिक भूमिकेबाबत कसं कॉम्प्रमाईज करणार, असा खरमरीत सवाल त्यांनी केला. आम्ही पाटावर जेवायला बसलो की आमचं ताट हिसकावून घेण्याचे काम केंद्र सरकार आणि अदृश्य शक्ती करत राहणार. मराठी लोकांच्या दीड ते दोन लाख नोकऱ्या दुसऱ्या राज्यात का गेल्या? राज्यातले मराठी पक्ष आहेत तेच कसे काय फुटतात? अशी टीकाही त्यांनी केली.
