#

Advertisement

Monday, November 20, 2023, November 20, 2023 WIB
Last Updated 2023-11-20T11:33:50Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पराभवानंतर पंतप्रधान मोदी ड्रेसिंग रुममध्ये आले अन्...

Advertisement

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये  एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्ड कप स्पर्धेचा शेवटचा सामना रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी पार पडला. या स्पर्धेत एकही सामना न हरलेल्या भारतीय संघाला दुर्देवाने अंतिम सामन्यात पराभवाचं तोंड पहावं लागलं अन् 12 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकण्याचं भारताचं स्वप्न धुळीस मिळालं. ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट्स राखून पराभव केला. पराभवामुळे भारतीय खेळाडू फारच निराश झाले. या खेळाडूंना धीर देण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी ड्रेसिंग रुममध्ये गेले होते.
आपल्याला एवढी मेहनत केल्यानंतरही वर्ल्ड कप जिंकता आला नाही याचं दु:ख भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. कर्णधार रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराजला मैदानातच अश्रू अनावर झाले. विराट कोहलीही मैदानातून बाहेर पडताना तोंड लपवूनच बाहेर पडला. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही मैदानात उपस्थित होते. भारताचा पराभव झाल्यानंतर पंतप्रधानांनी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंना धीर दिला. मोदींचा भारतीय ड्रेसिंग रुममधील फोटो भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पोस्ट केला आहे.

शमीने काय म्हटलं ....!
दुर्देवाने कालचा दिवस आमचा नव्हता. संपूर्ण स्पर्धेमध्ये मला आणि आपल्या संघाला पाठिंबा देणाऱ्या सर्व भारतीयांचे मी आभार मानतो. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार मानतो जे स्पेशली ड्रेसिंग रुममध्ये आले आणि त्यांनी आमचं मनोधैर्य वाढवलं. आम्ही नक्कीच पुन्हा दमदार पुनरागमन करु" 


रविंद्र जडेजा म्हटलं ....!
पराभवामुळे आम्हा सर्वांची निराशा झाली असली तरी चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे आम्ही पुढे वाटचाल करत राहू असं म्हटलं आहे. तसेच जडेजाने पंतप्रधान मोदींनी ड्रेसिंग रुममध्ये येऊन धीर दिला.