#

Advertisement

Monday, November 20, 2023, November 20, 2023 WIB
Last Updated 2023-11-20T11:20:00Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

"रेमंड'च्या मालकाचा "महागडा' घटस्फोट

Advertisement

मुंबई : रेमंड ग्रुपचे चेअरमॅन आणि भारतीय अरबपती गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांच्या घटस्फोटाची बातमी सध्या चर्चेत आहे. दोघांनीही लग्नाच्या 32 वर्षांनंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात गौतम सिंघानिया यांच्या पत्नीने घटस्फोटासंबंधी एक मोठी अट समोर ठेवल्याचे समोर आले आहे. नवाज मोदी सिंघानिया यांनी पोटगी म्हणून 8745 कोटींची रक्कम सिंघानिया यांच्याकडे मागितली असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.
देशातील दिग्गज बिझनेसमन आणि अरबपती गौतम सिंघानिया यांनी त्याच्या पत्नीपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. गौतम सिंघानियाकडून ठाण्यात दिवाळीची पार्टी आयोजित केली होती. मात्र, या पार्टीत त्यांची पत्नी नवाज सिंघानिया या अनुपस्थित होत्या. त्यामुळं पहिल्यांदाच त्यांच्याच काही अलबेल असल्याचे समोर आले होते. त्यानंतर गौतम यांनी ते वेगळे होत असल्याचे जाहिर केले होते. 
बिझनेस टुडेच्या एका वृत्तानुसार, नवाज मोदी सिंघानिया यांनी गौतम सिंघानिया यांच्या एकूण संपत्तीतील 75 टक्के हिस्सा मागितला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, त्यांची मुलगी निहारिका आणि निशा आणि स्वतःसाठी ही रक्कम मागितली आहे. 
गौतम सिंघानीया यांनी 1999मध्ये सॉलिसिटर नादर मोदी यांची मुलगी नवाज मोदी यांच्यासोबत लग्न केले होते. घटस्फोटाच्या चर्चांवर मागील 13 नोव्हेंबर रोजी स्वतः सिंघानिया यांनी एक भावूक पोस्ट केली होती. त्यांनी म्हटलं आहे की, आमच्यासाठी यावर्षीची दिवाळी आधीसारखी नाहीये. एक दाम्पत्य म्हणून आम्ही 32 वर्ष एकत्र होतो. आई-वडिलांच्या भूमिकेत गेल्यानंतर आम्ही आणखी शिकत गेलो आणि एकमेकांना खंबीरपणे आधार देत होते. आता आम्ही दोघं वेगळं होत असलो तरी निहारीका आणि निशा सिंघानीया यांचे पालनपोषण आणि काळजी पहिलेसारखेच आम्ही करु.