#

Advertisement

Friday, December 22, 2023, December 22, 2023 WIB
Last Updated 2023-12-22T11:42:05Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

2024 मध्ये टोलच्या नियमात होणार बदल

Advertisement

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींचा मोठा निर्णय 

दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. 2024 वर्ष हे चालकांच्यादृष्टीने महत्वाचा ठरणार आहे. जीपीएस आधारित टोल वसुली यंत्रणेबद्दल यावर्षी चर्चा सुरु होती. 2024 मध्ये ही  केंद्र सरकार ही यंत्रणा प्रत्यक्षात सुरू करणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे.
हायवे टोल प्लाझाच्या सध्याची यंत्रणा प्रणालीत हळुहळू बदल केला जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून सरकार पुढील वर्षी मार्चपर्यंत जीपीएस-आधारित टोल-टॅक्स कलेक्शन सिस्टमसह नवीन तंत्रज्ञान आणणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. देशातील टोल प्लाझा व्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी सरकार जीपीएस-आधारित टोल प्रणालीसह नवीन तंत्रज्ञान आणण्याचा विचार करत आहे. आम्ही पुढील वर्षी मार्चपर्यंत संपूर्ण देशभरात नवीन जीपीएस आधारित टोलवसुली सुरू करू, अशी माहिती गडकरींनी दिली.
या यंत्रणेमुळे चालकांचा वेळ वाचणार आहे. त्यांना टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी रांगा लावाव्या लागणार नाहीत. वाहने न थांबवता स्वयंचलित टोल वसुली केली जाईल. या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन सिस्टमचे दोन पायलट प्रोजेक्ट सुरू केले आहेत.